Lokmat News | अयोध्या ते रामेश्वरम राम मंदिरासाठी ‘रामराज्य रथयात्रा’ रवाना | Lokmat Marathi News

2021-09-13 0

अयोध्येच्या कारसेवकपुरम मध्ये साधू-संत, भाजप आणि विहिंपचे नेते जमा झाले होते. तिथे भाषण झालं, पूजा झाली, अयोध्येत राम मंदिर बनवण्याची शपथ घेण्यात आली, ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात आल्या आणि त्यानंतर रामराज्य रथयात्रा अयोध्येतून रामेश्वरमसाठी रवाना झाली.महाशिवरात्री ला सुरु झालेल्या या रथयात्रेचा रामनवमीला समारोप होईल.यात्रेसाठी जो रथ तयार करण्यात आला आहे,ती राम मंदिराच्या प्रतिकृतीसारखा आहे. यात्रेच्या मार्गात मध्य प्रदेश आणि कर्नाटक ही राज्येही आहेत. याच वर्षी एप्रिल-मे महिन्यात कर्नाटकमध्ये, तर वर्षअखेरपर्यंत मध्य प्रदेशात निवडणुका होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये सरकार आणण्याचे, तर मध्य प्रदेशात सत्ता कायम राखण्याचं आव्हान भाजपसमोर आहे. त्यासाठी रामराज्य रथयात्रा मदतीला धावेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आह


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires